26 November 2020

News Flash

करोनाप्रतिबंधासाठी अमेरिकेत रेमडेसिविरला अधिकृत मान्यता

याआधी त्याला आपत्कालीन उपचारांसाठी मान्यता दिली होती

संग्रहित छायाचित्र

 

जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार करोनाच्या गंभीर रुग्णात गुणकारी ठरत नसलेल्या रेमडेसिविर या औषधाला अमेरिकेच्या औषध प्रशासनाने मात्र करोनावरील पहिले अधिकृत औषध म्हणून मान्यता दिली आहे.

याआधी त्याला आपत्कालीन उपचारांसाठी मान्यता दिली होती. आता हे औषध  पूर्णपणे कोविड १९ उपचारात समाविष्ट करण्याच्या निर्णयामागे अमेरिकेतील करोना साथीत लाखो लोक बळी पडले असल्याचा अध्यक्षीय निवडणुकीत गाजत असलेला मुद्दा व कंपन्यांचे अर्थकारण यासारखी कारणे असू शकतात.

या औषधाची निर्मिती करणाऱ्या कॅलिफोर्नियाच्या गिलीड सायन्सेस इन्कार्पोरेशन या संस्थेने म्हटले आहे, की रेमडेसिविर औषधामुळे करोना रुग्ण १५ दिवसात बरे होण्याऐवजी दहा दिवसात बरे होऊ लागले. अमेरिकी राष्ट्रीय आरोग्य संस्थेने याबाबत संशोधन केले आहे. यापूर्वी उन्हाळ्यात अमेरिकेच्या औषध प्रशासनाने करोना उपचारात रेमडेसिविर औषधाला आपत्कालीन उपचारांसाठी मान्यता दिली होती, नंतर अलीकडे ट्रम्प यांना करोनाचा संसर्ग झाला असता त्यांना रेमडेसिविर औषध देण्यात आले होते. या औषधाचे दुसरे नाव वेकलुरी असून ते औषध १२ वर्षांवरील किमान ४० किलोपेक्षा जास्त वजनाच्या व रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेल्या करोना रुग्णांवर उपयोगाचे आहे. १२ वर्षांखालील मुला-मुलीतही काही प्रकरणात या औषधाचा आपत्कालीन वापर केला जाऊ शकतो. पन्नास देशांत रेमडेसिविरला करोनावरील तात्पुरते औषध म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्याच्या किमतीबाबत वाद आहेत. कुठल्याही अभ्यासात हे औषध करोनावर उपयुक्त असल्याचे सिद्ध  झालेले नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:04 am

Web Title: official recognition of remadecivir in the us for corona prevention abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 …तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवणार नाही : मेहबुबा मुफ्ती
2 “मत मागण्यासारखं एकही काम नसल्याने मोदी बिहारमध्ये कलम ३७० बद्दल बोलतायेत”
3 मुंबईतील जोडप्याला ड्रग्ज प्रकरणी कतारमध्ये दहा वर्षांची शिक्षा
Just Now!
X