21 October 2020

News Flash

उत्तराखंड सरकारचा आळशी सरकारी कर्मचाऱ्यांचा दणका, देणार सक्तीची निवृत्ती

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.

त्रिवेंद्रसिंह रावत, मुख्यमंत्री, उत्तराखंड

आपल्या कामात दिरंगाई करणाऱ्या आळखी सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्याची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.

जनतेची कामं करताना आळस आणि तिरस्काराची वृत्ती बाळगणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांबाबत अनेक तक्रारी आल्याने उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, अशा आळशी कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्त देण्याच्या योजनेवर आम्ही काम करत आहोत. अशा आळशी कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात सुधारणा करावी अन्यथा परिणामांना सामोरं जावं, असा निर्वाणीचा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री रावत म्हणाले, राज्य सरकार जनतेला दिलेल्या आपल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी बांधील असून त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांमधील प्रचलित कामाची पद्धत बदलणे गरजेचे आहे. त्यामुळेच कामात आळस करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्ती देण्याच्या दिशेने आमचे काम सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 5:09 pm

Web Title: officials who shirk work will be given compulsory retirement in uttarakhand aau 85
Next Stories
1 भारत-पाकिस्तानमध्ये चर्चेने काश्मीर प्रश्न सुटणार नाही – इम्रान खान
2 धक्कादायक! दहा वर्षांनंतर सुपरमार्केटमध्येच सापडला बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याचा मृतदेह
3 लिंग बदल शस्त्रक्रिया: राजेशचा सोनिया पांडे बनण्यासाठी संघर्ष
Just Now!
X