11 December 2019

News Flash

…तर भारत अमेरिकेला दुखावणारा मोठा निर्णय घेणार ?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. अमेरिकेने आपल्या भूमिकेत काही बदल केला नाही तर भारताला मोठा निर्णय घ्यावा लागेल.

चीन आणि भारत हे सध्याच्या घडीला जगातील दोन सर्वात मोठे तेल आयातदार देश आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामुळे हे दोन्ही देश सध्या अडचणीत सापडले आहेत. चीन आणि भारतासमोर तेलाच्या विषयावर जी अडचण आहे त्यासंबंधी दोन्ही देश काय भूमिका घेतात त्यावर तेलाच्या जागतिक व्यापाराची दिशा निश्चित होणार आहे.

चीन आणि भारत दोघांनी मागच्या तीन महिन्यात इराणकडून दररोज १४ लाख बॅरल क्रूड ऑइल आयात केले आहे. आता या दोन्ही देशांना हे ठरवायचे आहे कि, अमेरिकेच्या इच्छेनुसार इराणकडून संपूर्णपणे तेल आयात बंद करायची कि, अमेरिकेला साथ देत तेलाच्या वाढत्या किंमती सहन करायच्या. अमेरिेकेने इराणवर आर्थिक निर्बंध घातले असून त्यांच्याबरोबर ४ नोव्हेंबरपर्यंत सर्व व्यवहार संपवायला सांगितले आहेत.

अमेरिकेची नाराजी ओढवून इराणबरोबर व्यवहार सुरु ठेवले तर अमेरिकी बँकिंग व्यवस्थेबाहेर जाण्याचाही धोका आहे. अमेरिकेचे इराणबद्दलचे जे परराष्ट्र धोरण आहे त्याचा परिणाम जागतिक तेल बाजारावर होत आहे. इराणकडून तेल आयात पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णयावर ट्रम्प ठाम असतील तर प्रति बॅरल तेल पिंपाची किंमत १०० डॉलरपर्यंत पोहोचू शकते असे जाणकर सांगतात.

First Published on July 7, 2018 7:27 am

Web Title: oil import from iran america india china
टॅग China,India,Iran,Oil
Just Now!
X