05 July 2020

News Flash

धक्कादायक ! कुटुंबाची गरिबी मिटवण्यासाठी तरुणांकडून ओला ड्रायव्हरची हत्या

आरोपींना ब्रॅण्डेड कपडे विकत घ्यायचे होते

दिल्लीमधील अलीपूर परिसरात काही दिवसांपुर्वी एका ओला ड्रायव्हरचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी सहा तरुणांना अटक केली असून यामधील एकजण अल्पवयीन आहे. धक्कादायक म्हणजे कॅब विकून ब्रॅण्डेड कपडे विकत घेण्याच्या आणि आपल्या कुटुंबाला गरिबीतून वर काढण्याच्या हेतूने आरोपींनी हत्या केल्याचं समोर आलं आहे.

आरोपींची ओळख राहुल सैनी (२१), नवीन (२५), हेमंत (१९), अमित दहियार उर्फ बंटी (२५), विशाल (२०) अशी पटली आहे. याव्यतिरिक्त एक आरोपी अल्पवयीन आहे. या सर्वांनी पहिल्यांदाच गुन्हा केला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून कॅबसहित तीन देशी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसं जप्त केली आहेत.

गेल्या शुक्रवारी अलिपूर पोलिसांना खामपूर रेडिओ स्टेशनच्या मागच्या परिसरात अज्ञात मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी हा मृतदेह हरी नारायण असल्याचं सांगितलं होतं. त्याच्या टी-शर्टवरुन ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळालं होतं. त्याच्या कुटुंबाला कळवल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला होता.

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती. दरम्यान पोलिसांनी जीपीएसच्या सहाय्याने कॅबची हालचाल तपासली असताना कॅब नारेला, नाहरी, बंकनेर आणि खेरी मंजत येथून गेल्याचं लक्षात आलं. नाहरी विलेज हे तिचं अखेरचं लोकेशन होतं.

गुरुवारी पोलिसांनी राहुल, नवीन आणि हेमंतला अटक केली. त्यांनी आपल्या सहका-यांची नावे सांगितल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. राहुल, नवीन, हेमंत आणि बंटी हे बालमित्र आहेत. हे सर्वजण बेरोजगार होते आणि त्यांना पैशांची गरज होती. त्यांनी एक टोळी तयार केली आणि मोरादाबाद येथून पिस्तूल खरेदी केली.

२३ मार्चला नवीन आपल्या फोनवरुन ओला कॅब बूक केली. त्यांनी ड्रायव्हर नारायणला फोन केला आणि तो येताच आपलं बुकिंग रद्द केलं जेणेकरुन आपण पकडले जाऊ नये. यानंतर त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत नारायणला कार चालवायला लावली.

‘निर्जनस्थळी गेल्यावर त्यांनी गळा दाबून नारायणची हत्या केली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्यांनी मृतदेह टाकून दिला. यावेळी त्यांनी ओलाने दिलेलं सर्व सामान त्याच्याकडून काढून घेतलं, जेणेकरुन मृतदेहाची ओळख पटू नये. यानंतर ते कार विकण्यासाठी मार्ग शोधू लागले’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2018 5:22 pm

Web Title: old driver killed by youngsters for branded cloths
Next Stories
1 FB बुलेटीन: सीबीएसईच्या वादात राज ठाकरेंची उडी यासह अन्य महत्त्वाच्या बातम्या
2 नवज्योतसिंग सिद्धू इन्कम टॅक्सच्या कचाट्यात, दोन बँक खाती गोठवली
3 “समान नागरी कायद्याला भारतीय कौटुंबिक कायद्याचा पर्याय”
Just Now!
X