20 November 2019

News Flash

दारु पिताना मोबाइल वापरु नका, ओमर अब्दुल्लांनी टि्वट केला फोटो

महामार्गावरुन प्रवास करताना अनेकदा आपण दारु पिऊन गाडी चालवू नका, ड्रायव्हिंग करताना मोबाइल फोन वापरु नका असे सल्ला देणारे फलक पाहतो.

नेहमीच आपल्या उपरोधिक टि्वटसमुळे चर्चेत रहाणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू वाहतूक पोलीस विभागाची एक गंभीर चूक निदर्शनास आणून दिली आहे.

महामार्गावरुन प्रवास करताना अनेकदा आपण दारु पिऊन गाडी चालवू नका, ड्रायव्हिंग करताना मोबाइल फोन वापरु नका असे सल्ला देणारे फलक पाहतो. वाहनचालकांनी गाडी चालवताना जास्त काळजी घ्यावी हा हेतू त्या फलकांमागे असतो. पण जम्मू ग्रामीणच्या वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना अजब सल्ला देणारा फलक रस्त्यावर लावला आहे.

दारु पिताना मोबाइल फोन वापरु नका असा संदेश या फलकावर लिहिला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या टि्वटर अकाऊंटवर या फलकाचा फोटो पोस्ट केला असून हा नवीन सल्ला पाहा असे म्हटले आहे.

First Published on June 20, 2019 7:17 pm

Web Title: omar abdullah tweet mobile phone drinking driving dmp 82
Just Now!
X