03 March 2021

News Flash

धक्कादायक! वाढदिवसाच्या दिवशीच प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार करुन केली हत्या

आपण मंदिरात चाललोय असे घरी सांगून तरुणी घरातून बाहेर पडली.

प्रतिनिधीक छायाचित्र

वाढदिवसाच्या दिवशीच प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार करुन तिची हत्या केली. हैदराबादच्या वारंगल जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. तरुणीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. मृत तरुणीचा बुधवारी वाढदिवस होता. आरोपीने तिला फोन करुन भेटायला बोलावले. वनइंडिया वेबसाइटने हे वृत्त दिले आहे.

आपण मंदिरात चाललोय असे घरी सांगून तरुणी घरातून बाहेर पडली. पण ती प्रियकराला भेटायला गेली. आरोपी तिला स्वत:च्या गाडीमधून निर्जन स्थळी घेऊन गेला व तिथे तिच्यावर बलात्कार केला. लैंगिक जबरदस्ती सुरु असताना तरुणीचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे असे पोलिसांनी सांगितले. बलात्काराच्या धक्क्याने, कार्डिअ‍ॅक अरेस्ट किंवा फिट येऊन तरुणीचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

प्राथमिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या तरी पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. आरोपी प्रियकराने तरुणीच्या घराजवळ तिचा मृतदेह फेकला व नैसर्गिक मृत्यू झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

बुधवारी रात्री उशिरापर्यंत तरुणी घरी परतली नाही तेव्हा तिच्या भावाने पोलिसात तक्रार नोंदवली. आरोपी पदवीच्या शेवटच्या वर्षाला असून काही महिन्यांपूर्वी आरोपी आणि तरुणीची ओळख झाली होती. आरोपीला तरुणीबरोबर लैंगिक संबंध ठेवायचे होते. पण तिचा विरोध होता. वाढदिवसाची संधी साधून आरोपीने शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने तिला भेटण्यासाठी म्हणून बोलावले. त्यानंतर तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

या दरम्यान तरुणीचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर मृत्यू कसा झाला ते स्पष्ट होईल. पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३७६ (बलात्कार), ३०२ (हत्या) आणि २०१ कलमातंर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 2:48 pm

Web Title: on birthday woman raped murdered by boyfriend dmp 82
Next Stories
1 ‘त्या’ वक्तव्यामुळे भाजपानेच वाढवली संजय राऊतांची सुरक्षा
2 ‘रेड’ चित्रपटात काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीचे निधन
3 “… तर साध्वी प्रज्ञा यांना जिवंत जाळू”
Just Now!
X