News Flash

जादूटोण्याच्या संशयातून मुलानेच जन्मदात्या आईची केली हत्या

आई आपल्यावर जादूटोणा करते या संशयापोटी मुलानेच जन्मदात्या आईला संपवले. वडिलांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली.

आई आपल्यावर जादूटोणा करते या संशयापोटी मुलानेच जन्मदात्या आईला संपवले. तेलंगणच्या राजान्ना सरसिला जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. वडिलांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली. डी.श्रीनिवास (३०) असे आरोपीचे नाव आहे. श्रीनिवास वारंवार आजारी पडत होता.

आई जादूटोणा करते त्यामुळेच हे सर्व घडतेय असा त्याने समज करुन घेतला होता. याच संशयातून त्याने आईची हत्या केली. रविवारी रात्री श्रीनिवासने गळा आवळून आईची हत्या केली. जादूटोण्याच्या संशयातून भारतात आतापर्यंत शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात बहुतांश महिला आहेत.

आसाममध्ये २००१ ते २०१७ दरम्यान ११४ महिला आणि ७९ पुरुषांवर जादूटोणा केल्याचा आरोपावरुन त्यांची हत्या करण्यात आली आहे. जादूटोण्याच्या एका प्रकरणात झारखंड न्यायालयाने १४ डिसेंबरला दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांच्यावर महिलेची हत्या आणि तिच्या नवऱ्याला जखमी केल्याचा आरोप होता. जादूटोण्याच्या संशयातून या महिलेची हत्या करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 11:35 am

Web Title: on black magic suspicion man killed mother
Next Stories
1 ‘भाजपा- अण्णा द्रमुकची युती कोणत्या विचारधारेवर आधारित?’
2 नेहरुंचं ‘ते’ भाषण मला फार आवडतं; नितीन गडकरींकडून कौतुक
3 ‘ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांनी संस्कृत भाषेचा अपमान केला’
Just Now!
X