धार्मिक सुट्टीच्या दिवशी भारतीयांचा पॉर्न पाहण्याकडे कल कमी असतो. सणावाराला खासकरुन दिवाळीमध्ये भारतातून पॉर्न साइटच्या ट्रॅफिकमध्ये मोठया प्रमाणावर घट होते. पॉर्नोग्राफी पाहण्यामध्ये भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे असा दावा रवी अग्रवाल यांनी त्यांच्या नवीन पुस्तकातून केला आहे. स्वस्तातले स्मार्टफोन आणि डाटामुळे भारताच्या डिजिटल वर्तणुकीत काय बदल होत आहेत त्यावर अग्रवाल यांनी आपल्या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

सर्चिंग फॉर सनी- द राईज ऑफ पॉर्नोग्राफीमध्ये या भागामध्ये लेखकाने पॉर्नहब.कॉम या लोकप्रिय पॉर्न वेबसाइटच्या २०१६ च्या रिपोर्टचा हवाला देऊन धार्मिक सुट्टीच्या दिवशी भारतीय जास्त पॉर्न पाहत नाहीत असा दावा केला आहे. दिवाळीमध्ये भारतातून पॉर्न ट्रॅफिकमध्ये १७ टक्के घट होते. रविवारी सुद्धा भारतात पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या कमी असते पण तेच शनिवारी मोठया प्रमाणावर पॉर्न कंटेट पाहिला जातो असा लेखकाचा दावा आहे.

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनी भारतातून पॉर्न ट्रॅफिकमध्ये मोठया प्रमाणावर वाढ होते. पॉर्नसाठी भारत महत्वाची बाजारपेठ असल्याचे पॉर्नहब २०१७ च्या अहवालात म्हटले आहे. अमेरिका आणि युनायटेड किंगडम पाठोपाठ पॉर्नोग्राफीच्या ग्राहकांमध्ये भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे.

गुगलने पाटणा रेल्वे स्टेशनवर मोफत वाय-फाय सुविधा दिल्यानंतर त्या ठिकाणातून सर्वाधिक पॉर्न वेबसाइटस सर्च केल्या जायच्या. भारतात ज्या वेगाने डिजिटलायझेशन वाढत आहे त्यावरही या पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे. २००० साली फक्त २० मिलियन भारतीय इंटरनेट वापरायचे. पण २०१७ मध्ये हाच आकडा ४६५ मिलियनपर्यंत पोहोचला. प्रति सेकंद तीन भारतीय इंटरनेटवर वापरतात असे या पुस्तकात म्हटले आहे