News Flash

“अयोध्येप्रमाणेच आता मथुरा आणि वाराणसीतील मंदिरांसाठी लढा देणार”

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी दिली बैठकीनंतर माहिती

संग्रहीत छायाचित्र

अखिल भारतीय आखडा परिषदेने सोमवारी एक घोषणा केली आहे. अयोध्या रामजन्मभूमी लढ्याप्रमाणेच मथुरा आणि वाराणसी येथील ”हिंदू मंदिरं मुक्त” करण्याच्या अभियानासाठी आम्ही पुढाकार घेऊ, यासाठी कायदेशीर लढा देणार असल्याचे आखाडा परिषदेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

सर्व १३ आखाडा प्रमुखांची आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली प्रयागराज येथे पार पडलेल्या बैठकीत हा ठराव संमंत करण्यात आला.

”वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर व मथुरा येथील कृष्ण जन्मभूमी मुक्त करण्यासाठी आज आम्ही ठराव संमंत केला आहे. मुघलशाहीच्या काळात मुस्लिम आक्रमकांनी आणि दहशतवाद्यांनी आमची मंदिरं उद्धवस्त करून, त्या ठिकाणी मशिदी व मकबरे बांधले. ज्या प्रमाणे संत समुदायाने अयोध्येतील राम जन्मभूमीसाठी मोहीम राबवली व प्रकरण निकाली निघाले, त्यानुसारच आम्ही वाराणसी व मथुराबाबत करण्याचे ठरवले आहे. वाराणसी व मथुरा येथील हिंदू मंदिरं पाडण्यात आल्याप्रकरणी आखाडा परिषदेच्यावतीने तक्रारी देखील दाखल केल्या जाणार आहेत.” असं परिषदेचे महंत गिरी म्हणाले.

मंदिरं मुक्त करण्यासाठीच्या कायदेशीर लढ्यात आम्ही विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सारख्या हिंदुत्ववादी संघटनांची देखील मदत घेणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की या कायदेशीर लढाईचा निकाल आमच्या बाजूनेच लागेल, असे देखील त्यांनी या वेळी बोलून दाखवले.

अयोध्या रामजन्मभूमी निकालानंतर वाराणसी आणि मथुरा येथील मशिदींच्या वादासंदर्भातील आंदोलन सुरु होणार का? अशी चर्चा रंगू लागली होती. याच कालावधीमध्ये विश्व हिंदू परिषदेने १९९२ साली दिलेल्या ‘अयोध्या तो झाँकी है, काशी- मथुरा बाक़ी है’ चा नाऱ्याची आता पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 9:00 am

Web Title: on the lines of ram janmabhoomi movement will join legal battle to free temples in varanasi and mathura akhara parishad msr 87
Next Stories
1 हत्येचा आरोप असलेल्याची जमावाकडून पोलिसांच्या समोरच हत्या
2 भारत-चीन वाद : ‘अरुणाचल प्रदेशला आम्ही कधी मान्यताच दिली नाही, तो तर दक्षिण तिबेटचा भाग’; चीनचा दावा
3 लडाखमध्ये भारत-चीनच्या जवानांमध्ये पुन्हा संघर्ष?; भारतानं गोळीबार केल्याचा पीएलएचा आरोप
Just Now!
X