माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज (२५ डिसेंबर) ९४ वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, त्यांचे स्मृतीस्थळ असलेल्या राष्ट्रीय स्मृतीस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध नेत्यांनी सकाळी अटलजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी गर्दी केली होती.


माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही राष्ट्रीय स्मृतीस्थळावर जाऊन अटलजींना श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर अनेक केंद्रीय मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी अटलजींना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर सोशल मीडितही नेटकऱ्यांनी अनेक ट्विट, फेसबुक पोस्ट त्याचबरोबर व्हॉट्सअॅप मेसेजेसद्वारे अटलजींना आदरांजली वाहिली.

२५ डिसेंबर १९२४ मध्ये ग्वालियारमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला होता. तर १६ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांचे निधन झाले. अटलजी भलेही आपल्याला सोडून गेलेले असले तरी त्यांची वाणी, त्यांचे जीवन दर्शन, त्यांचा राजकीय प्रवास सर्व भारतीयांना कायम प्रेरणा देत राहील.