News Flash

लग्नाच्या रात्री सेक्सला नकार दिला म्हणून पतीने केली पत्नीला मारहाण

लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्स करायला नकार दिला म्हणून नववधूला नवऱ्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्स करायला नकार दिला म्हणून नववधूला नवऱ्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली आहे. या प्रकरणी पत्नी प्रियंका तिवारीने पती धर्मेंद्र शर्मा विरोधात कृष्णनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

लग्नातले विधी आणि स्वागत समारंभ यामध्ये थकून गेल्यामुळे मी झोपले होते. धर्मेंद्र माझ्या खोलीत आले. त्यांनी सेक्स करण्याचा प्रयत्न केला. पण मी नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या धर्मेंद्रने आपल्याला अपशब्द सुनावले. माझे बाहेर प्रेम प्रकरण सुरु असल्याचा आरोप केला असे प्रियंकाने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

दुसऱ्या दिवशी धर्मेंद्र माझ्या आई-वडिलांशी बोलला त्यानंतर त्याने मला मारहाण केली. माझ्या रडण्याचा आवाज ऐकून सासरे आणि अन्य नातेवाईक मदतीसाठी धावून आले असे प्रियंकाने म्हटले आहे. घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलमातंर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 9:59 am

Web Title: on wedding night wife beaten up by husband as she declined sex
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटीन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 मसूदवर बंदीसाठी चीनने घातली होती पाकवर हल्ला न करण्याची अट
3 शोपियनमध्ये सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
Just Now!
X