आज २७ सप्टेंबर म्हणजेच जागतिक पर्यटन दिन. आज सकाळपासूनच #WorldTourismDay हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड होताना दिसत आहे. याच दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आगळ्यावेगळ्या पद्धतीने टीका केली आहे. काँग्रेसने मोदीचे एक फोटो कोलाज ट्विट करुन जागतिक पर्यटन दिनाचा शुभेच्छा दिल्या आहेत.

काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमानामध्ये जातानाचा अभिवादन करतानाचे १८ फोटो एकत्र केले आहेत. या फोटोंमध्ये मोदी विमानाच्या दाराशी जाऊन उपस्थितांना अभिवादन करताना दिसत आहेत. सततच्या परदेश दौऱ्यांमुळे मोदींवर विरोधीपक्षांकडून टीका केली जाते. आजच्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून काँग्रेसने मोदींना लक्ष्य केलं आहे. या ट्विटमध्ये काँग्रेसने विमानाचे इमोजीही वापरला आहे. यामधून त्यांनी मोदींच्या परदेश दौऱ्यावरुन टीका केल्याचे स्पष्ट होत आहे.

मोदींच्या परदेश दौऱ्यांची आकडेवारी

दरम्यान, पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये दहा देशांनी भेट दिली आहे. २०१४ साली पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून मोदींनी ५५ महिन्यांमध्ये ९३ परदेश दौरे केले. त्या सर्व दौऱ्यांवर एकूण २०२१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची बरोबरी केली आहे. त्यांनी १० वर्षांत ९३ विदेश दौरे केले होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १५ वर्षांत ११३ विदेश दौरे केले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ४८ दौरे केले होते. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ६८ वेळा विदेश दौरे केले होते. मोदी यांच्या प्रत्येक दौऱ्यावर २२ कोटी रुपये खर्च झाले तर मनमोहन सिंग यांच्यासाठी २७ कोटी खर्च झाले आहेत. दक्षिण कोरियापूर्वी मोदी यांनी ९२ विदेश दौरे केले आहेत. त्यावर एकूण २०२१ कोटी रुपये खर्च झाले. त्यांच्या एका दौऱ्यावर सरासरी २२ कोटी रुपये खर्च झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक दौरे २०१५ मध्ये केले. या वर्षी ते २४ देशांमध्ये गेले. २०१६ व २०१८ मध्ये १८-१८ देशांत गेले. २०१४ मध्ये ते १३ देशांमध्ये गेले होते. मोदी यांनी प्रत्येकी ५ वेळा अमेरिका तर प्रत्येकी ३ वेळा फ्रान्स-जपानचा दौरा केला. मोदींनी पाच वर्षांत एकूण ४९ विदेश दौरे केले. यादरम्यान ते ९३ देशांत गेले. त्यातील ४१ देश असे आहेत, जेथे ते पहिल्यांदा गेले. १० देशांमध्ये ते दोन वेळा गेला. फ्रान्स, जपानमध्ये ३-३ वेळा गेले. चीन-अमेरिकेत ५-५ वेळा गेले. रशिया, सिंगापूर, जर्मनी, नेपाळमध्ये ४-४ वेळा गेले.