‘अ‍ॅशले मॅडिसनचे’ भारतात दीड लाख वापरकर्ते
पुरूष मग ते कुठल्याही देशातले असोत त्यांच्यात काही प्रमाणात बाहेरख्यालीपणाच्या मनोवृत्ती असतात, कधी त्या प्रत्यक्ष सामोऱ्या येतात तर कधी ऑनलाईन संकेतस्थळांवरून चुपके चुपके चोरी चोरी हे उद्योग सुरू असतात. भारतीय पुरूषही त्याला अपवाद नाहीत अ‍ॅशले मॅडिसन या बाहेराख्यालीपणाला मोकळी वाट करून देणाऱ्या संकेतस्थळाची काही माहिती हॅकर्सनी चोरली होती पण ती बाहेर आली नव्हती. आता या माहितीनुसार या संकेतस्थळाचे १.४ लाख वापरकर्ते भारतात असल्याचे उघड झाले आहे. त्यात दिल्लीतील ३८६५२ जण आहेत.
मॅडिसन संकेतस्थळ मोफत असले तरी तुम्हाला पुरूष किंवा स्त्रीला संदेश पाठवायचे असतील तर शुल्क आकारले जाते. ही फसवणूक करून घेण्यासाठी अनेक लोक पैसा खर्च करतात, जोधपूरपासून नागरकॉईल पर्यंत भारतीय लोकांनी या संकेतस्थळावर नोंदणी केली असून विवाह बाह्य़ संबंधाचा रोमांच अनुभवण्याचा हेतू त्यात आहे. लाईफ इज शॉर्ट. हॅव अ‍ॅन अफेअर. आयुष्य खूप लहान आहे त्यामुळे लफडी करा हे या संकेतस्थळाचे घोषवाक्य आहे.
नवी दिल्ली नंतर मुंबईतील ३३०३६, चेन्नईतील १६४३४, कोलकात्यातील ११८०७ वापरकर्ते आहेत. स्पॅनिश डिजिटल संस्था टेकनीलॉजिका या संस्थेने म्हटल्यानुसार यात जगभरात पुरूष वापरकर्ते अधिक आहे तरी भारतातील काही स्त्रियाही त्याचा वापर करतात. हैदराबाद १२८२५, बंगळुरू ११३६१, अहमदाबाद ७००९, चंडीगड २९१८ जयपूर ५०४५, लखनौ ३८८५, पाटणा २५२४ या प्रमाणे वापरकर्ते आहेत.
३७ दशलक्ष वापरकर्त्यांचे अग्रक्रम या माहितीतून सामोरे आले आहेत त्यात पश्चिम युरोपातील व अमेरिकेतील लोकांची संख्या यात जास्त आहेत. भारत, लॅटिन अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या देशातील लोक हे संकेतस्थळ वापरतात. ब्रिटनमधील वापरकर्त्यांची संख्या १२ लाख आहे. त्यात वैज्ञा्िनक, सरकारी कर्मचारी, पोलिस अधिकारी, डॉक्टर्स यांचा समावेश आहे.
कॅनडातील अविद लाईफ मीडिया या कंपनीचे अ‍ॅशले मॅडिसन हे संकेतस्थळ आहे. ही माहिती चोरी म्हणजे गुन्हेगारी आहे असे त्या कंपनीचे म्हणणे आहे.