News Flash

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ याच महिन्यात भाजपाचा एक खासदार देणार राजीनामा – राकेश टिकैत

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

(संग्रहित छायाचित्र)

शेतकरी आंदोलनातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या राकेश टिकैत यांनी केलेल्या एका वक्तव्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या दाव्यांमुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे. राकेश टिकैत यांनी दावा केला आहे की, याच महिन्यात शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ एक भाजपा खासदार राजीनामा देणार आहे. मात्र त्यांनी त्या खासदाराचं नाव उघड केलेलं नाही.

राकेश टिकैत यांनी केलेल्या या दाव्या नंतर देशभरातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत, तसेच, तो भाजपा खासदार कोण असेल? कुठला असेल याबाबत देखील अंदाज लावले जात आहेत. तर, पश्चिमी उत्तर प्रदेश किंवा हरियाणा येथील तो खासदार असल्याचाही अनेकांनी दावा केला आहे.

या अगोदर मुजफ्फरनगरच्या मीरापुर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार अवतार सिंह भडाना यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी कृषी कायद्याविरोधातच राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.

राकेश टिकैत याच महिन्यात पाच राज्यांचा दौरा करणार आहेत. किसान यूनियनचे माध्यम प्रभारी धर्मेंद्र मलिक यांनी सांगतिले आहे की, राकैश टिकैत मार्चममध्ये राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि तेलंगणचा दौरा करतील व शेतकरी आंदोलनासाठी अनेकांचं समर्थन मिळवतील.

..अन्यथा ४० लाख ट्रॅक्टरसह संसदेला घेराव!

वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या वेशींवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला तीन महिने झाले असून नवी ऊर्जा भरण्याचे प्रयत्न शेतकरी नेत्यांकडून केले जात आहेत. केंद्राने तोडगा काढला नाही तर, संसदेला घेराव घालण्याचा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. तर, या आंदोलनाची व्याप्ती देशभर वाढवताना प्रामुख्याने किमान आधारभूत मूल्याच्या मुद्दय़ावर संयुक्त किसान मोर्चाकडून भर दिला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 7:27 pm

Web Title: one bjp mp will resign this month in support of farmers agitation rakesh tikait msr 87
Next Stories
1 टीएमसीचा उप निवडणूक आयुक्तांवर नाही विश्वास; पदावरून हटवण्याची मागणी
2 Kerala Assembly Election : राहुल गांधींना त्यांच्याच मतदारसंघात झटका; ४ नेत्यांचा काँग्रेसला रामराम!
3 केरळ – ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन असणार भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
Just Now!
X