News Flash

काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; बीएसएफ जवान शहीद

पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये हाकनाक आपल्या नागरिकांचे आणि जवानांचे बळी जात आहेत. शुक्रवारी पहाटे झालेल्या ताज्या

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये हाकनाक आपल्या नागरिकांचे आणि जवानांचे बळी जात आहेत. शुक्रवारी पहाटे झालेल्या ताज्या गोळीबारात एक बीएसएफ जवान शहीद झाला आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.


जम्मू-काश्मीरच्या आर. एस. पुरा सेक्टर या भागात शुक्रवारी पहाटे पाकिस्तानी रेंजर्सकडून अचानक गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, कारवाईदरम्यान एका बीएसएफ जवानाला सर्वोच्च बलिदान द्यावे लागले. त्याचबरोबर दोन नागरिक यात जखमी झाले असून आंतरराष्ट्रीय सीमेच्या ३ किमीच्या त्रिज्येच्या परिसरातील शाळांना स्थानिक प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याच्या दोन दिवस आधी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची घटना कालच घडली होती. पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तुफान गोळीबार केला होता. या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला होता.

दरम्यान, मंगळवारीही सांबामध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचा एक कॉन्स्टेबल शहीद झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 5:43 am

Web Title: one bsf soldier has lost his life in ceasefire violation by pakistan in rs pura sector at jk
Next Stories
1 पंधरा दिवसांत बंगले खाली करा; युपी सरकारच्या माजी मुख्यमंत्र्यांना नोटिसा
2 न्यायालयात बहुमत सिद्ध करण्यास भाजपचा विरोध
3 महात्मा गांधींच्या ‘त्या अपमानाला’ १२५ वर्षे पूर्ण
Just Now!
X