लिबियात ६०० जणांना घेऊन जाणारे जहाज उलटून झालेल्या दुर्घटनेत १५० प्रवासी बुडून मृत पावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इटलीतून लिबियाकडे जात असताना ही दुर्घटना घडली. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संस्थेचे (आयओएम) प्रवक्ते फ्लाविया दी गियाकोमो यांनी दिलेल्या ट्विटरवर माहिती देताना सांगितले की, जहाज उलटल्यानंतर तातडीने केलेल्या बचाव कार्यामुळे ४०० जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. तसेच २५ मृतदेह सापडले आहेत. येथील वृत्तसंस्थेने या दुर्घटनेची माहिती देताना जहाजावर ६०० प्रवासी असल्याचे स्पष्ट केले. इटलीच्या तटरक्षक दलाने या अपघातात १०० प्रवासी बुडाल्याचे म्हटले आहे. कप्तान डोनाल गॅलाघेर म्हणाले की, अपघातानंतर साधारणत: १५० प्रवासी पाण्यात बुडाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One fifty people sank in libya
First published on: 06-08-2015 at 12:30 IST