25 September 2020

News Flash

चांगलं लक्षण! दिल्लीत तीन पैकी एका व्यक्तीच्या शरीरात कोविड अँटीबॉडीज

करोना होऊन गेलाय हे अनेकांना कळलंही नाही...

संग्रहित छायाचित्र

दिल्लीत जवळपास ३३ टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. तिसऱ्या सिरोलॉजिकल सर्वेच्या प्राथमिक विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. ११ जिल्ह्यातून १७ हजार नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले. या सर्वेचा काय रिझल्ट आहे, तो अधिकृतपणे पुढच्या आठवड्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

दिल्लीची लोकसंख्या दोन कोटीच्या घरात आहे. त्यातील ६६ लाख लोकांना करोनाची बाधा झाली व त्यांच्या शरीरात आता अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. करोनामुक्त झाल्यानंतर शरीरात या अँटीबॉडीज तयार होतात. दुसरा सिरो सर्वे ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात करण्यात आला होता. त्यात २९.१ टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज सापडल्या होत्या. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

जून अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवडयात करण्यात आलेल्या पहिल्या सिरो सर्वेमध्ये २३.४ टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या होत्या. दुसऱ्या सिरो सर्वेत १५ हजार आणि पहिल्या सर्वेत २१ हजार नमुने गोळा करण्यात आले होते. शरीरात अँटीबॉडीज तयार होणे हे एक चांगले लक्षण आहे. “ज्यांच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत, ते करोनामुक्त झाले आहेत. आपल्याला करोनाची बाधा झालीय आणि आपण त्यातून बरे झालो आहोत, हे अनेकांना माहितही नाही” असे अधिकाऱ्याने सांगितले. शरीरात अँटीबॉडीजची वाढ होणे, ही दिल्ली हर्ड इम्युनिटीच्या दिशेने जात असल्याचा संकेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 11:30 am

Web Title: one in three delhiites has covid antibodies latest sero survey dmp 82
Next Stories
1 उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा, म्हणाले…
2 “GDP घसरलाय, RBI कंगाल झाली आहे अन् सरकारनं कंपन्यांचा मोठा सेल लावलाय”
3 ‘भाभीजी के पापड’ खाऊन लोक बरे झालेत का?; संजय राऊत यांचा संसदेत सवाल
Just Now!
X