21 January 2021

News Flash

चीनसोबत तणाव असतानाच पाकिस्तानकडूनही आगळीक; गोळीबारात एक भारतीय जवान शहीद

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताकडून चोख प्रत्युत्तर

संग्रहित

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असून जम्मू काश्मीरमधील कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा घाटीत पहाटे साडे तीन वाजता तर नौशेरा सेक्टरमध्ये पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यांकडून गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. भारतीय लष्कर पाकिस्तानी सैन्यांना चोख उत्तर देत आहे. दरम्यान गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पहाटे साडे तीन वाजता अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर राजौरी जिल्ह्यातील नौशेरे सेक्टरमध्ये साडे पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबारास सुरुवात झाली. भारतीय जवान पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर देत असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल आनंद यांनी दिली आहे.

दरम्यान नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर करण्यात आलेल्या गोळीबारात पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना भारतीय जवान शहीद झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 11:25 am

Web Title: one indian army jawan has lost his life in the ceasefire violation by pakistan army sgy 87
Next Stories
1 गोव्यामध्ये करोनाचा पहिला बळी
2 पुरीत जगन्नाथ रथयात्रा होणार की नाही? आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
3 मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनमोहन सिंग यांची टीका, म्हणाले चीनला होऊ नये फायदा
Just Now!
X