News Flash

अलगीकरण केंद्रावरून चकमकीत एक ठार

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्य़ातील घटना

संग्रहित छायाचित्र

बीरभूम जिल्ह्य़ातील गावातील शाळेत अलगीकरण केंद्र स्थापन करण्यावरून गावकऱ्यांच्या दोन गटांत शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत एक जण ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पारुई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तालिबपूर गावात ही चकमक उडाली, त्यामध्ये एक जण ठार झाला. तो बॉम्बस्फोटात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

या प्रकारानंतर गावात पोलीस तैनात करण्यात आले असून स्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण आहे. पोलिसांनी चकमक कोणत्या कारणावरून उडाली ते स्पष्ट केलेले नाही. तालिबपूर गावातील एका शाळेत अलगीकरण केंद्र तयार करण्यात येणार होते. गावातील काही जण या अलगीकरण केंद्राच्या बाजूने तर काही जण विरोधात होते. या दोन्ही गटांत उसळलेल्या हिंसाचारात तरुणाचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 12:12 am

Web Title: one killed in clash with separation center abn 97
Next Stories
1 करोनाची लागण झालेल्या संशयित रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न
2 करोना विरोधात देशाची एकजूट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रज्ज्वलित केली समई
3 करोना विरोधात लढण्यासाठी अवघा देश एकवटला, सगळीकडे दिव्यांची रोषणाई
Just Now!
X