लंडन : बर्मिगहॅम शहरात रात्री भोसकाभोसकीचे प्रकार घडले असून त्यामध्ये एक जण ठार झाला, तर अन्य सात जण जखमी झाले आहेत. ब्रिटन पोलिसांनी रविवारी या हत्येची आणि भोसकाभोसकीच्या प्रकारांची चौकशी सुरू के ली आहे.

वेस्ट मिडलॅण्ड पोलिसांनी हा प्रकार दहशतवादाशी अथवा टोळीयुद्धाशी संबंधित असल्याच्या वृत्ताचा इन्कार के ला आहे. जखमींपैकी एक महिला आणि एका पुरुषाची प्रकृती चिंताजनक आहे, तर अन्य पाच जखमींच्या जिवाला धोका नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बर्मिगहॅममधील कॉन्स्टिटय़ूशन हिल येथे एका इसमाने भोसकाभोसकीला सुरुवात के ली त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

या प्रकाराला जबाबदार असलेल्याचा कसून शोध घेण्यात येत असून त्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, त्याचप्रमाणे नेमके  काय घडले त्याचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मुख्य अधीक्षक स्टीव्ह ग्रॅहम यांनी सांगितले.

ज्यांच्याकडे या प्रकाराचे सीसीटीव्ही फु टेज अथवा भ्रमणध्वनीमध्ये चित्रीकरण असेल त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.