छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये पाच लाखांचा इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हा नक्षलवादी ठार झाला.
दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक अभिषेक पल्लव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्याकडून ९ एमएमचे एक पिस्तुल हस्तगत करण्यात आले. छिकपल आणि मरजूमधील जंगलात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. ज्यामध्ये हा नक्षलवादी ठार झाला.
One naxal, carrying a reward of Rs 5 Lakhs, killed in exchange of fire between security forces and naxals in jungles between Chikpal and Marjum. One 9 mm pistol recovered. More details awaited: Dantewada SP Abhishek Pallav #Chhattisgarh
— ANI (@ANI) January 13, 2021
या अगोदर छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलींचा खात्मा करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या ताब्यातील मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला होता.
तर, दंतेवाडा जिल्ह्य़ात नोव्हेंबरमध्ये २७ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली होती. त्यापैकी काही जणांना पकडण्यासाठी रोख इनाम जाहीर करण्यात आले होते.पोलीस पथकांवर हल्ले करणे, भूसुरुंगाचा स्फोट घडविणे यामध्ये या नक्षलवाद्यांचा हात होता, त्यांच्यापैकी पाच जणांवर प्रत्येकी एक लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2021 12:14 pm