News Flash

छत्तीसगढ : एक लाखाचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा

सुकमामध्ये झाली चकमक, घातक शस्त्रसाठा जप्त

(संग्रहित छायाचित्र)

छत्तीसगढमधील सुकमा येथे झालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. वंजम बुधू असे नाव असलेल्या या नक्षलवाद्यावर एक लाख रूपयांचे बक्षीस होते. शिवाय तो निलामाडगु क्रांतिकारी लोक समितीचा प्रभारी व जन मिलिशियाचा कमांडर होता. गुरूवारी सुकमात झालेल्या चकमकीदरम्यान डीआरजीच्या जवानांनी त्याचा खात्मा केला.

या घटनेबाबत सुकमाचे पोलिस अधिक्षक शालभ सिन्हा यांनी सांगितले की, मुरलीगुडा आणि अटकल भागातील जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही डीआरजीचे पथक या भागात शोध घेण्यासाठी पाठवले होते. दरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, यास जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकी दरम्यान जवानांना या नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला. शिवाय घटनास्थळावरून नक्षलवाद्यांची शस्त्र, औषधांसह शस्त्रक्रियेच्या सामानाच्या पिशव्या देखील हस्तगत करण्यात आल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 2:57 pm

Web Title: one naxli killed in chattisgardh msr 87
Next Stories
1 जम्मू काश्मीर: कुलगाममध्ये स्फोट, एकाचा मृत्यू; दोघे जखमी
2 अमेरिकेत प्लास्टिकच्या पिशवीत सापडले नवजात अर्भक; नाव ठेवले ‘बेबी इंडिया’
3 ‘सकाळी ९ वाजता ऑफिसमध्ये हजर रहा, अन्यथा कारवाईला तयार व्हा’
Just Now!
X