राष्ट्रीय तपास यंत्रणेस (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. एनआयएने बंगळरूमधुन हबीबुर रहमान शेख यास अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील खगरागढ येथे २०१४ मध्ये झालेल्या स्फोटातील हबीबुर रहमान शेख हा मुख्य आरोपी आहे. विशेष म्हणजे एनआयएने या आरोपीवर दहा लाखांचे बक्षीस देखील जाहीर केले होते.