News Flash

जैशसोबत RSS ची तुलना, एकाला अटक

फेसबूकवर केली तुलना

प्रतिकात्मक छायाचित्र

फेसबूकवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)ची तुलना दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशमधील जरवल खंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनंतर सोमवारी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

जरवल खंड येथील रशीद अहमद याने आरएसएसची तुलना दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदसोबत केल्यानंतर स्थानिक आरएसएस नेता अजय कुमार वर्मा यांनी नाराजी व्यक्त करत तक्रार दाखल केली होती. अजय कुमार वर्मा यांनी फेसबूकवर करण्यात आलेल्या या तुलनेला आरएसएसचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

अजय कुमार वर्मा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अखेर मंगळवारी जखल येथील चौकात आरोपीला बेड्या ठोकल्या. कलम २९५ ए आणि ५०५ नुसार आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नवीन कुमार मिश्रा यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 11:35 pm

Web Title: one person arrested for comparing rss with jaish e mohammad
Next Stories
1 Second world war : ‘त्या’ खलाशाच्या उरल्या फक्त आठवणी 
2 जैश ए मोहम्मदने पुलवामाची जबाबदारी स्वीकारली, हा पुरावा पुरेसा नाही का?
3 Pulwama Attack: तुमच्या देशद्रोही मुलाला बाहेर काढा! जमावाची घरावर धडक
Just Now!
X