News Flash

छत्तीसगड : चार नक्षलवाद्यांचा खात्मा, पोलीस उपनिरीक्षक शहीद

घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा जप्त

छत्तीसगडमध्ये राजनांदगाव येथे झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. मात्र या मध्ये पोलीस उपनिरीक्षक श्यामकिशोर शर्मा हे शहीद झाले. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या मानपूर ठाणा क्षेत्रातील पारधोनी गावाजवळ शुक्रवारी मध्यरात्री ही चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे.

या चकमकीनंतर घटनास्थळावरून जवानांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले, तसेच एक एके-47 रायफल, एक एसएलआर रायफल, दोन 315-बोर रायफलसह शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन महिला नक्षलींचा समावेश आहे.

नक्षल मोहीमेचे एएसपी जी एन बघेल यांनी सांगितले की, पोलिसांचे पथक शुक्रवारी रात्री जंगल परिसरात शोध मोहीमेवर निघाले होते. याच दरम्यान दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. जवळपास एक तास गोळीबार सुरू होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 9:44 am

Web Title: one police sub inspector si lost his life and 4 naxals killed in an encounter msr 87
Next Stories
1 Coronavirus : देशभरात चोवीस तासांत 3 हजार 320 नवे रुग्ण, 95 मृत्यू
2 भाजपा कार्यकर्त्याने मजुरांकडून उकळलं तीन पट ट्रेन भाडं, विरोध करणाऱ्याला मारहाण; काँग्रसेचा आरोप
3 “आरोग्य सेतू अ‍ॅप हे पाळत ठेवण्यासाठीच, हॅकही करता येणं शक्य”; फ्रेंच हॅकरचा खळबळजनक दावा
Just Now!
X