News Flash

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच ; एक जवान शहीद

उरी सेक्टरमध्ये करण्यात आला गोळीबार, भारताकडूनही चोख प्रतित्युत्तर

संग्रहीत छायाचित्र

सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. आज, जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर येथे पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. भारतीय जवानांकडून देखील पाकिस्तानच्या गोळीबारास चोख प्रतित्युत्तर देण्यात आले आहे.

या अगोदरही तंगधर आणि कंझलवान सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. ज्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले व दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले होते. भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानी सैनिकांचे एक तळ देखील उद्धवस्त झाले होते.

जम्मू-काश्मीर भागातील एलओसीवर ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात ९५० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे. त्यांनी यावेळी हे देखील सांगितले की, भारतीय जवानांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्यांना वेळोवेळी चोख प्रत्त्युत्तर देण्यात आलेले आहे.

भारत सरकारने जम्म-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तान अधिकच चिडलेला आहे. परिणामी पाकिस्तानकडून सर्वप्रकारे भारतविरोधी कारवाया करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय दहशतवाद्यांना भारताता घुसखोरीसाठी मदत देखील केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 7:42 pm

Web Title: one soldier has lost his life in ceasefire violation by pakistan msr 87
Next Stories
1 सीएए, एनआरसीच्या समर्थनार्थ अमेरिकेतील भारतीय एकवटले!
2 हेमंत सोरेन यांच्या शपथविधीस लालू प्रसाद यादव येणार नाहीत
3 शॉपिंगसाठी आरबीआयने आणला ‘पीपीआय’चा नवा पर्याय; जाणून घ्या याविषयी
Just Now!
X