काश्मीरमधील पूँछ जिल्हय़ातील चकमकीत सुरक्षा दलांनी आणखी एका दहशतवाद्यास ठार केले असून, कारवाईत मरण पावलेल्या दहशतवाद्यांची संख्या आता चार झाली आहे. सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने सांगितले, की आणखी एक दहशतवादी मारला गेला असून, कालपासून सुरू असलेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या आता चार झाली आहे.

तीन दहशतवादी व एक पोलीस अशा चार जणांचा काल मृत्यू झाला व सहा जण जखमी झाले, त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश होता. पूँछ शहरात सुरक्षा दले व चार दहशतवादी यांच्यात दोन चकमकी झाल्या. हुतात्मा पोलिसावर पूँछ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे

पोलीस महानिरीक्षक जॉनी विलीयन यांनी सांगितले, की एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला असून, तेथे काल एक दहशतवादी मारला गेला होता. बांधकाम चालू असलेल्या सचिवालयात गोळीबार चालू आहे. सुरक्षा दले व दहशतवादी यांच्यात दोन ठिकाणी चकमकी झाल्या आहेत. सचिवालयात आग लागली असून, हे ठिकाण लष्कराच्या ९३ ब्रिगेड मुख्यालयाजवळ आहे. पूँछ जिल्हा व अलाहपीर मोहल्ल्यातील एक घर येथे चकमकी झाल्या आहेत. दोन चकमकीत चार दहशतवादी सामील होते, असे पोलीस महासंचालक राजेंद्र कुमार यांनी सांगितले.

काल सायंकाळी दहशतवाद्यांनी जेथे आश्रय घेतला होता, तेथून एका नागरिक दाम्पत्याची सुटका करण्यात आली. अधिकाऱ्यांनी ड्रोन विमानांचा वापर करून सचिवालय संकुलातील दहशतवाद्यांना शोधून काढले. इतर ठिकाणीही काल चकमकी झाल्या होत्या.