News Flash

जम्मू काश्मीरच्या हंदवाडात एक दहशतवादी ठार

दहशतवाद्याकडे असलेली एके ४७ जप्त करण्यात आली आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

जम्मू काश्मीर येथील हंदवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. हंदवाडा येथील यारू या भागात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. ज्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत दहशतवाद्याकडे असलेली एके-४७ ही रायफल जप्त करण्यात आली आहे. तर या भागात शोध मोहीम राबवण्यात येते आहे.

दरम्यान आज सकाळीच जम्मू काश्मीरच्या दक्षिण आणि उत्तर भागात प्रत्येकी दोन अशा चार ठिकाणी दहशतवाद्यांसोबत सुरक्षारक्षकांची चकमक सुरु होती.पहाटे केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं आहे. या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 2:04 pm

Web Title: one terrorist has been killed by security forces in handwara one ak 47 weapon recovered
Next Stories
1 ओवेसी म्हणतात, अब की बार, ना भाजपा,ना काँग्रेसकी सरकार
2 धक्कादायक ! विद्यार्थ्यांनी केलेली हत्या लपवण्यासाठी शाळेने पुरला 12 वर्षीय मुलाचा मृतदेह
3 देशभक्ती म्हणजे काय हे शिकवणारे तुम्ही कोण? उर्मिला मातोंडकरचा सवाल
Just Now!
X