जम्मू-काश्मीरमधील अवंतिपोरामध्ये सुरु असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. मंगळवारपासून ही चकमक सुरु आहे. काल भारतीय लष्कराचा एक जवान, एसपीओ आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलाचा एक जवान शहीद झाला. मंगळवारी रात्री शोध मोहिम थांबवल्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा हे ऑपरेशन सुरु झाले.

दोन दहशतवादी आत लपल्याची शक्यता आहे. दक्षिण काश्मीरमध्ये मोठया प्रमाणात दहशतवादी आहेत. दहशतवादविरोधी ऑपरेशन्सना पुन्हा गती देण्यात आली आहे. आतापर्यंत आम्ही दहशतवाद्यांविरोधात सहापेक्षा जास्त ऑपरेशन्स यशस्वी केली असून, यापुढेही आमची मोहिम अशाच पद्धतीने सुरु राहिल. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही अधिक मेहनत करु असे जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक दिलबाग सिंह यांनी सांगितले.