05 June 2020

News Flash

कांद्याचे दर घसरले; प्रतिकिलो ९.५० रुपये

घाऊक बाजारात ७ रुपये प्रतिकिलो ते १४.२२ रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे

| February 3, 2016 02:06 am

घाऊक बाजारात ७ रुपये प्रतिकिलो ते १४.२२ रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे

लासलगाव घाऊक बाजारपेठेत चालू आर्थिक वर्षांत कांद्याचे दर ७६ टक्क्यांहून अधिक घसरले असून ते प्रतिकिलो ९.५० रुपये इतके झाले आहेत. सप्टेंबर महिन्यांत प्रतिकिलो ४१.३० रुपये इतका दर होता.
नाशिकस्थित ‘एनएचआरडीएफ’नुसार कांदा घाऊक बाजारात ७ रुपये प्रतिकिलो ते १४.२२ रुपये प्रतिकिलो या दराने विकला जात आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. खरिपाचे पीक आल्याने पुरवठय़ात वाढ झाली असून त्यामुळे दर घसरत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या वर्षी दर सर्वात कमी असून त्यामध्ये आणखी एक ते दोन रुपये प्रतिकिलो घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने गेल्या ऑगस्ट महिन्यात राजधानीत कांद्याचे भाव ८० रुपये प्रतिकिलो होते. मात्र दर स्थिर ठेवण्यासाठी यंदा सरकारने कांद्याची आयातही केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2016 2:06 am

Web Title: onion prices dropped in lasalgaon wholesale market
टॅग Onion,Onion Prices
Next Stories
1 आयएसआयच्या गुप्तहेरास पठाणकोट प्रकरणी अटक
2 राजनाथसिंह-मुस्लीम धर्मगुरूंमध्ये चर्चा
3 समलैंगिकतेवरील याचिकांची सुनावणी आता घटनापीठाकडे
Just Now!
X