News Flash

‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय, लवकरच ऑनलाईन गेम्सवर बंदी

ऑनलाईन गेम्समुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा दावा...

(प्रातिनिधिक छायाचित्र)

इंटरनेटवर सध्या ऑनलाईन गेम्सची लाट आली आहे, हजारो गेम इंटरनेटवर उपलब्ध आहेत. लहानग्यांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत अनेकांना असे गेम खेळायची सवय लागलीये. पण, ऑनलाईन गेम्समुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा दावा करत लवकरच त्यावर बंदी आणण्याचे संकेत कर्नाटक सरकारने दिले आहेत.

कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी याबद्दल माहिती दिली. “ऑनलाईन गेम्सच्या नादात नागरिकांकडून कष्टाने कमावलेल्या पैशांचा अपव्यय होत आहे, त्यामुळे राज्यात लवकरच ऑनलाईन गेम्सवर बंदी आणली जाईल”, असे बोम्मई म्हणाले. “ऑनलाईन गेम्सबाबत पालकांच्या आणि अन्य अेक लोकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्यात अशाप्रकारच्या गोष्टींना प्रोत्साहन मिळू नये यासाठी ऑनलाईन गेम्सवर बंदी आणण्याचा विचार आहे”, असं बोम्मई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

“विद्यार्थी, लहान मुलं, मुली दिवसभर गेम खेळण्यात व्यस्त असतात. इतकंच नाही तर मोठ्या व्यक्तीही ऑनलाईन गेम्सवर बरेच पैसे वाया घालवतायेत, हा एकप्रकारचा जुगार झालाय. ऑनलाईन गेम्समुळे अनेक कुटुंब त्रस्त असून त्यांची कमाई वाया जात आहे, त्यामुळे कर्नाटक सरकार या गेम्सवर बंदी आणण्याचा गांभीर्याने विचार करत आहे”, असं बोम्मई यांनी म्हटलं. बंदी घालण्यासाठी ज्या राज्यांनी ऑनलाईन गेम्सवर यापूर्वीच बंदी आणली आहे, त्या राज्यांकडून सूचना मागवण्यात येतील , अशी माहितीही बसवराज बोम्मई यांनी दिली.

दरम्यान, ऑनलाईन गेम्सवर बंदी आणण्याच्या कर्नाटक सरकारच्या विचाराला राज्यातील विरोधी पक्षाकडूनदेखील पाठिंबा मिळाला आहे. काँग्रेस नेते दिनेश गुंडु राव यांनी गृहमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 11:19 am

Web Title: online games to be banned soon in karnataka sas 89
Next Stories
1 गोव्यात भाजपाविरोधात शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी?; शरद पवारांशी करणार चर्चा
2 सर्वाधिक करोना रुग्ण आढळून येणाऱ्या १० राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश
3 “भाजपा नेत्यांच्या घरातील आंतरधर्मिय विवाह ‘लव्ह जिहाद’ आहेत का?”
Just Now!
X