News Flash

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने परवेझ मुशर्रफ आणखी अडचणीत

किस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने मुशर्रफ यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

| February 27, 2016 02:54 am

loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi,sport news in marathi, bollywood news in marathi, hafeej saeed parwez Musharraf jamat ud dawa terrorism terrorist
परवेझ मुशर्रफ (संग्रहित छायाचित्र)

२००७ साली राज्यघटनेचा अवमान केल्याबद्दल केवळ तत्कालीन लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावर खटला चालवण्यात यावा, असा निर्णय पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने मुशर्रफ यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

मुशर्रफ हे २००७ साली राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी देशात आणीबाणी लागू केल्याबद्दल ७२ वर्षांच्या मुशर्रफ यांच्याविरुद्ध २०१३ साली देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्य़ाच्या तपासातून आपल्याला वगळावे ही माजी सरन्यायाधीश अब्दुल हमीद डोगर यांची विनंती न्यायालयाने मान्य केली. याशिवाय आणखी तिघांची नावेही न्यायालयाने आरोपींच्या यादीतून वगळली.

माजी पंतप्रधान शौकत अझीझ, माजी मंत्री झाहीद हमीद व माजी सरन्यायाधीश डोगर यांच्या नावांचा आरोपींमध्ये समावेश करून या प्रकरणाचा फेरतपास करावा, असा आदेश मुशर्रफ यांच्यावरील खटल्याची सुनावणी करणाऱ्या तीन सदस्यांच्या विशेष न्यायालयाने दिला होता.

या आदेशाविरुद्ध डोगर यांनी केलेले अपील इस्लामाबाद उच्च न्यायालयाने फेटाळले होते. मात्र त्याविरुद्ध त्यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात केलेले अपील मान्य करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2016 2:54 am

Web Title: only musharraf be tried for treason pakistan supreme court
टॅग : Musharraf,Pakistan
Next Stories
1 राज्यसभेत पुन्हा आरोप-प्रत्यारोप
2 स्मृती इराणी खोटे बोलल्या; रोहितच्या कुटुंबीयांचा आरोप
3 चिदंबरम, पिल्लई यांच्या वक्तव्याचे लोकसभेत तीव्र पडसाद
Just Now!
X