News Flash

दोन दशकात फक्त एकाच बलात्काऱ्याला दिली गेली फाशी

२००४मध्ये धनंजय चॅटर्जी याला बलात्काराच्या प्रकरणात फाशी देण्यात आली होती.

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा दिल्ली न्यायालयानं कायम ठेवली. न्यायालयाच्या निर्णयाचं जनतेमधून स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर या शिक्षेमुळे महिलांवरील अत्याचारांना आळा बसेल असंही मत व्यक्त करण्यात आलं. मात्र, गेल्या दोन दशकात बलात्काराच्या घटनेत दुसऱ्यांदाच आरोपींना फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. यापूर्वी २००४मध्ये धनंजय चॅटर्जी याला फाशी देण्यात आली होती.

भारतात मागील तीन दशकांमध्ये आतापर्यंत १६ जणांना त्यांच्याकडून झालेल्या अमानुष गुन्ह्यांमुळे फाशी देण्यात आली. यात गेल्या दोन दशकांमध्ये केवळ चार जणांनाच फाशी दिली गेली असून, यातील तिघे दहशतवादी होते.
दिल्ली न्यायालयानं मंगळवारी निर्भया प्रकरणातील चारही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्यांना २२ जानेवारी रोजी दिल्लीतील तिहार तुरूंगात फाशी देण्यात येणार आहे. २००१ पासून आतापर्यंत बलात्काराच्या प्रकरणात दुसऱ्यांदाच फाशीची दिली जात असून, यापूर्वी २००४मध्ये एका आरोपीला फासावर लटकावण्यात आलं होतं. धनंजय चटर्जी याला १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणात फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

गेल्या २० वर्षात एकूण चार जणांना फाशी देण्यात आली आहे. त्यातील तिघे हे दहशतवादी होते.
२६/ ११च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. अजमल कसाबला फाशीची शिक्षा देण्यासाठी ४ वर्षे लागली होती.
त्यापूर्वी २०१३मधील फेब्रुवारी महिन्यात काश्मिरी दहशतवादी अफजल गुरूला तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. १ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ल्यातील अफजल गुरू आरोपी होता.

अफजलबरोबरच बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात ३० जुलै २०१५ रोजी याकूब मेमन याला १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालयानं दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 2:48 pm

Web Title: only one rapists were hanged in two decades abn 97
Next Stories
1 भारताने शांततेसाठी मध्यस्थी करावी, इराणने व्यक्त केली अपेक्षा
2 #CAA: अमित शाह यांच्या रॅलीत विरोध; १५० जणांचा जमाव तरुणींच्या घरावर गेला चालून
3 Ayatollah ali khamenei: ‘खरा बदला अजून बाकी आहे’, इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ट्रम्पना इशारा
Just Now!
X