News Flash

Hathras case : चांगले संस्कारच रोखू शकतात बलात्कार, भाजपा आमदाराचं वक्तव्य

या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं

उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी झालेल्या सामूहिक बलात्काराचं प्रकरण ताजं असतानाच भाजपा आमदाराने या प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. चांगले संस्कारच बलात्कार रोखू शकतात असं वक्तव्य भाजपाचे बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे. “मी फक्त एक आमदार नाही तर एक चांगला शिक्षकही आहे. त्यामुळे मी हे सांगतो आहे की आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात. गुन्ह्यांवर वचक ठेवणं हे सरकारचं काम आहे यात शंकाच नाही. मात्र मुलींवर चांगले संस्कार घडवणं त्यांना शालीन राहण्यास शिकवणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे” असं  भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.

उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी एका युवतीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिच्यावर हल्लाही झाला. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. योगी सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे.

हाथरस प्रकरणावरुन उत्तर प्रदेश सरकार, भाजपा आणि मोदी सरकारवर टीका होते आहे. अशात भाजपा आमदार सुरेंद सिंह यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी  “मी फक्त एक आमदार नाही तर एक चांगला शिक्षकही आहे. त्यामुळे मी हे सांगतो आहे की आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात. गुन्ह्यांवर वचक ठेवणं हे सरकारचं काम आहे यात शंकाच नाही. मात्र मुलींवर चांगले संस्कार घडवणं त्यांना शालीन राहण्यास शिकवणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे”  असं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 9:44 am

Web Title: only sanskaar can stop rape incidents says ballias bjp mla surendra singh amid hathras gang rape scj 81
Next Stories
1 Feeling Well! करोनामुक्त होऊन लवकरच परतेन-ट्रम्प
2 एनसीबी उपसंचालकांना करोना, दीपिकासह इतर अभिनेत्रींची केली होती चौकशी
3 अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं वयाच्या २७ व्या वर्षी निधन
Just Now!
X