08 March 2021

News Flash

चीनचा अमेरिकी संगणकांवर दुसरा मोठा सायबर हल्ला

चीनच्या लष्करासाठी काम करणाऱ्या हॅकर्सनी अमेरिकेच्या सरकारी संगणकातील माहिती चोरली आहे.

| June 7, 2015 04:21 am

चीनच्या लष्करासाठी काम करणाऱ्या हॅकर्सनी अमेरिकेच्या सरकारी संगणकातील माहिती चोरली आहे. आताच्या व माजी अशा मिळून ४० लाख सरकारी कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती चोरण्यात आली असून आतापर्यंत अमेरिकी संगणकावर चीनने केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. आम्ही सायबर हल्ला केल्याचा अमेरिकेचा आरोप बेजबाबदारपणाचा आहे असे चीनचे प्रवक्ते होंग लेइ यांनी सांगितले. सायबर हल्ले निनावी असतात व त्यांचे मूळ शोधणे कठीण असते असेही ते म्हणाले.
व्यक्तिगत व्यवस्थापन कार्यालयाने निवेदनात म्हटले आहे की, संघराज्य कर्मचाऱ्यांची माहिती चोरण्यात आली आहे.   वर्षांत दुसऱ्यांदा अशाप्रकारे सायबर हल्ला झाला आहे. आताचा हल्ला देशाची सुरक्षा व अर्थव्यवस्था यासाठी धोकादायक आहे, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 4:21 am

Web Title: opm data breach china hits back at us over federal workers
Next Stories
1 सुवर्ण मंदिरातील लाठीमारात सहा युवक जखमी
2 अद्रमुक नेत्या सुलोचना संपत यांचे निधन
3 घुसखोरीच्या प्रयत्नात तीन अतिरेकी ठार
Just Now!
X