News Flash

राज्यांचा विरोध घटनाबाह्य – सीतारामन

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील ठराव

(संग्रहित छायाचित्र)

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीस नकार देण्याची काही राज्यांची कृती घटनाबाह्य़ असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. संसदेने संमत केलेला कायदा लागू करणे ही राज्यांची जबाबदारी आहे व ती त्यांनी पार पाडणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

चेन्नई सिटिझन्स फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, हा कायदा लागू करणार नाही असा ठराव विधानसभा करते व आपण त्यांना  रोखू शकत नाही हे दुर्दैवी आहे, असा ठराव करणे ही राजकीय कृती आहे. संसदेने केलेला कायदा लागू करण्याची जबाबदारी या देशातील सर्वाची आहे.

सीएए कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित जनजागृती मोहिमेत त्यांनी सांगितले की, राज्यांनी संसदेने केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस नकार देणे हे घटनाबाह्य़ आहे.

केरळने गेल्या आठवडय़ात नागरिकत्व कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याशिवाय केरळ व पंजाब या राज्यांनी या कायद्याविरोधात विधानसभांमध्ये ठराव मंजूर केले आहेत.

राजस्थान विधानसभेतही प्रस्तावाची तयारी

जयपूर : राजस्थानमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याची (सीएए) अंमलबजावणी करण्याच्या विरोधात विधानसभेत ठराव करण्याचे घाटत असून, २४ जानेवारीला सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो मांडला जाणार आहे. सत्राच्या पहिल्याच दिवशी मंजूर होण्याची शक्यता आहे.

नागरिकत्व कायदा, नागरिकत्व नोंदणी दोन्ही अनावश्यक – शेख हसीना

दुबई : नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या दोन्ही भारताच्या अंतर्गत बाबी आहेत, पण या दोन्ही कृती अनावश्यक होत्या, असे मत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी व्यक्त केले आहे. भारत सरकारने या दोन गोष्टी कशासाठी केल्या हे समजत नाही, त्या दोन्ही अनावश्यक होत्या, असे हसीना यांनी गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 12:27 am

Web Title: opposition to states against revised citizenship laws is unprecedented abn 97
Next Stories
1 हुथी बंडखोरांच्या क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ल्यात येमेनमध्ये ८० सैनिक ठार
2 हॅरी, मार्कल यांच्या राजघराण्यातून बाहेर पडण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या
3 नायजेरियात समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या १९ भारतीयांची सुटका; एकाचा मृत्यू
Just Now!
X