04 December 2020

News Flash

पाकिस्तानपासून ‘सुरक्षित अंतर ठेवा’; समाजवादीचा पंतप्रधानांना सल्ला

काँग्रेसची मोदी-नवाझ शरीफ भेटीवर काहीही प्रतिक्रिया नाही

भारताने पाकिस्तासोबत कोणत्याही प्रकारे सौहार्दाचे संबंध ठेवू नयेत असे आवाहन विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यापासून नरेंद्र मोदी यांनी दूर राहावे असाही सल्ला विरोधकांनी दिला आहे. पाकिस्तान हा दहशतवादी कारवाया करून कायम भारताच्या कुरापती काढतो आहे. हे धोरण पाकिस्तानने गेल्या अनेक दिवसांपासून सोडलेले नाही. अशात आता भारताने पाकिस्तानविरोधात ठोस भूमिका घ्यावी असे मत समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेकडे व्यक्त केले आहे.

भारताने पाकिस्तानसोबत सुरक्षित अंतर ठेवावे असे मत असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. आज सकाळीच कझाकिस्तानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवाझ शरीफ यांची भेट घेतली त्यानंतर या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. तर काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. पंतप्रधानांनी नवाझ शरीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यामध्ये गैर काय? असा प्रश्न सिंघवी यांनी विचारला आहे. तसेच विरोधी पक्षाने कायम सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक कृतीवर प्रतिक्रिया द्यायलाच हवी असे काही नसते. असेही सिंघवी यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2017 2:14 pm

Web Title: opposition urges pm narendra modi to maintain distance from pakistans nawaz sharif
Next Stories
1 पंतप्रधान नरेंद्र मोदी-शी जिनपिंग यांची अस्तानामध्ये भेट, चीनचे एससीओतले महत्त्व कमी होणार?
2 अरविंद केजरीवाल यांच्या जनता दरबारमध्ये कपिल मिश्रा यांचे भजन-कीर्तन
3 मोदी सरकार २०१९ पूर्वीच कोसळेल: लालूप्रसाद यादव
Just Now!
X