वन रँक वन पेंशन या योजनेसाठी गेले तीन महिने सुरु असलेले माजी सैनिकांचे उपोषण आज पंतप्रधानांनी केलेल्या खुलाश्यानंतर मागे घेण्यात आले आहे. राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे माजी सैनिकांचे उपोषण सुरु होते.
स्वेच्छानिवृत्तीबाबतच्या खुलाश्‍यानंतर आम्ही आमच्या लोकांना उपोषण मागे घेण्यास सांगत आहोत. पण, आमच्या मागण्यांबाबत लेखी आश्‍वासन मिळेपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे निवृत्त मेजर जनरल सतबीर सिंह यांनी म्हटले. स्वेच्छानिवृत्ती घेणा-या सैनिकांनाही या योजनेचा लाभ मिळेल असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. मोदींच्या खुलाश्‍यानंतर उपोषण करत असलेल्या माजी सैनिकांमध्ये आनंद पसरला आणि त्यांनी पेढे वाटले.