ओसामा बिन लादेनचा १२ वर्षांचा नातू ओसामा बिन हमजा बिन लादेनचा मृत्यू झाला. ‘अल-कायदा’ने पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून ओसामा बिन हमजा बिन लादेन ‘शहीद’ झाला, असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. ओसामा बिन हमजा बिन लादेनच्या मृत्यूच्या कारणावरुन मात्र संभ्रम आहे. हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. तर आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावाही एका वृत्तवाहिनीने केला आहे.

अल कायदासाठी काम करणाऱ्या ग्लोबल इस्लामिक मीडिया फ्रंटतर्फे इंग्रजीत अनुवाद केलेले एक पत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्राद्वारे लादेन कुटुंबीयांना संबोधित करण्यात आले आहे. ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनने हे पत्र लिहीले आहे. ‘माझा मुलगा आणि ओसामा बिन लादेनचा नातू ओसामा बिन हमजा बिन लादेन (१२) शहीद झाला’ असे या पत्रात म्हटले आहे. हमजा पुढे म्हणतो, माझ्या मुलाच्या जीवनावर त्याच्या आजोबांचा प्रभाव होता. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर त्याला मानसिक धक्का बसला होता. त्याच्यावर एवढा परिणाम होईल असे आम्हालाही वाटले नव्हते.

Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
Mumbai, One person beaten,
मुंबई : दुचाकी चोरत असल्याच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू, मालवणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी | Worker died after crane hook fell on his head
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

‘आयुष्यातील शेवटच्या काही दिवसांमध्ये लहान मुलांसोबत खेळताना तो ‘शहीद’ झाल्याचे नाटक करायचा. तो जमिनीवर पडून राहायचा. त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असायचे’ अशी आठवण हमजाने पत्रात सांगितली. ओसामा बिन हमजाच्या मृत्यूचे नेमके कारण त्याने सांगितलेले नाही.

पाक- अफगाणिस्तान सीमेवरील हवाई हल्ल्यात ओसामा बिन हमजा लादेनचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. लष्करी कारवाईत मृत्यू झालेला लादेन कुटुंबातील तो पाचवा सदस्य आहे. मात्र, अल- अरेबिया या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार ओसामा बिन हमजा लादेनचा मृत्यू आजारपणामुळे झाला. त्यामुळे ओसामा बिन हमजाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यावरुन संभ्रम निर्माण झाला आहे.

ओसामा बिन लादेनला अमेरिकेने ठार मारल्यानंतर त्याचा मुलगा हमजा हा अल कायदाचा म्होरक्या झाल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. जगभरातील दहशतवादी संघटनांना एकत्र आणून आयसिसला हादरा देण्याचा त्याचा प्रयत्न आहे.