भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना वाराणसी लोकसभा मतदारसंघातून थेट ओसामा बिन लादेन याने आव्हान दिले आहे.
मुळचे बिहारी असलेले  हे अल कायदाचा एकेकाळचा प्रमुख ओसामा बिन लादेनसारखे दिसणआरे मेराज खालीद नूर हे मूळचे बिहारी आहेत. सर्व जण त्यांना लादेन या नावानेच ओळखतात. नूर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी यांच्याआधीच आपण निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार असल्याचे नूर यांनी म्हटले आहे. इतक नव्हे तर नूर ‘राम इंडिया’ नावाचा पक्ष स्थापन केला आहे. नूर यांनी याआधी राम विलास पासवान आणि लालू प्रसाद यादव यांच्यासाठी निवडणूकीमध्ये प्रचार सुद्धा केला आहे. मात्र या नेत्यांनी आपला वापर करुन घेतल्याचा आरोप सध्या नूर करत आहेत.
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अजय राय, तर आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल हे उभे आहेत.