बेन बेन ऍफलेक यांच्या ‘आर्गो’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा ऑस्कर मिळाला. ‘लिंकन’मधील अभिनयासाठी डॅनिअल डे-लेविस याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर जेनिफर लॉरेन्स हिला ‘सिल्व्हर लायनिंग प्लेबूक’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. 
हॉलिवूडमधील सर्वोच्च समजल्या जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये स्थानिक वेळेनुसार रविवारी संध्याकाळी झाला. हॉलिवूडमधील प्रख्यात कलाकार या सोहळ्यासाठी डॉल्बी थिएटरमध्ये जमले होते.
ऑस्करमध्ये यंदा वर्चस्व ‘लाइफ ऑफ पाय’ चित्रपटाचे राहिले. दिग्दर्शक आंग ली यांच्या या चित्रपटाला चार विभागांत पुरस्कार मिळाले. व्हिज्युअल इफेक्ट्स, सिनेमॅटोग्राफी, बेस्ट ओरिजनल स्कोअर आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या चार विभागांत ‘लाइफ ऑफ पाय’ने ऑस्करवर नाव कोरले. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा ऑस्कर ख्रिस्तोफ वॉल्ट्ज याला मिळाला तर एनी हॅथवे हिला लेस मिजरेबलसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
परदेशी भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ऑस्ट्रियातील ‘अमोर’ला मिळाला. मायकल हेनेक याचे दिग्दर्शक आहेत.

ऑस्कर पुरस्कार विजेते

आर्गो – सर्वोत्कृष्ट चित्रपट (बेन बेन ऍफलेक)
डॅनिअल डे-लेविस – सर्वोत्कृष्ट अभिनेता (लिंकन)
जेनिफर लॉरेन्स – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सिल्व्हर लायनिंग्ज प्लेबूक)
आंग ली – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (लाइफ ऑफ पाय)
ऍडल आणि पॉल एपवर्थ – सर्वोत्कृष्ट संगीत (स्कायफॉल)
ख्रिस्तोफ वॉल्ट्ज – सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता
एनी हॅथवे – सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री
सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन – विल्यम गोल्डनबर्ग (आर्गो)
जॅकलीन दुरान – सर्वोत्कृष्ट वेशभूषा निर्मिती (ऍना कॅरेनिना)
पेपरमॅन – सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुपट
ब्रेव्ह – सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट
क्लॉडिओ मिरांडा – सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी (लाइफ ऑफ पाय)
आंग ली – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (लाइफ ऑफ पाय)
क्वेंटिन टॅरांटिनो – सर्वोत्कृष्ट पटकथा (जॅंगो अनचेंनड्)