News Flash

काश्मिरी तरुणांवर होणारे हल्ले दुर्दैवी-पंतप्रधान नरेंद्र मोदी

आपला लढा काश्मीरसाठी आहे काश्मीर विरोधात नाही हे प्रत्येकानं लक्षात घ्यावं असंही मोदींनी म्हटलं आहे

काश्मिरी तरुणांवर होणारे हल्ले दुर्दैवी आहेत, आपल्या देशाची लढाई ही काश्मीरसाठी आहे काश्मीर विरोधात नाही. काश्मीर खोऱ्यात जो दहशतवाद उसळला आहे त्याविरोधात आपली लढाई आहे. काश्मिरी तरूणांचा यात काहीही दोष नाही. काश्मिरी तरूणांवर हल्ल्याच्या काही घटना घडल्या. या घटना दुर्दैवी आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काश्मिरी विद्यार्थ्यांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत अशा घटना घडू नयेत अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. राजस्थान येथील टोंक या ठिकाणी झालेल्या रॅलीत ते बोलत होते.

याच रॅलीत त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी जेव्हा इम्रान खान यांची नियुक्ती झाली तेव्हा मी त्यांचे अभिनंदन केले. मी त्यांना हेदेखील सांगितले की आपण दारिद्र्य आणि निरक्षरता या दोन्ही समस्यांशी आपण एकत्रित लढा देऊ असं मी त्यांना म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की मी पठाणाचा मुलगा आहे आणि मी माझा शब्द पाळेन. आता ते त्यांचा शब्द पाळणार का? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे असं मोदींनी म्हटलं आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात राग आणि संताप व्यक्त होतो आहे. या हल्ल्यात चाळीसपेक्षा जास्त जवान शहीद झाले. मात्र यानंतर देशात काश्मिरी तरूणांना लक्ष्य केलं जातं आहे. काश्मिरी तरूणांचा यात काहीही दोष नाही त्यांच्यावर हल्ले होण्याच्या घटना का घडतात? देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही अशी घटना घडणं चूक आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 3:58 pm

Web Title: our fight is for kashmir not against kashmir not against kashmiris says pm modi
Next Stories
1 अखेर बेकरीवाल्याला झाकावे लागले ‘कराची’ शब्द
2 पुलवामा हल्ल्यानंतर जैशच्या कमांडरला जवानांनी १०० तासात ठार केल्याचा सार्थ अभिमान-मोदी
3 काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या १०० तुकडया होणार तैनात, १५० जणांना घेतले ताब्यात
Just Now!
X