News Flash

दर्दे दिल, दर्दे जिगर दिल्लीमें जगाया ‘आप’ने म्हणत गंभीरचा केजरीवालांवर निशाणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आश्वासानांशिवाय काहीही दिलं नाही असंही गौतम गंभीरने म्हटलं आहे

गौतम गंभीर (संग्रहीत छायाचित्र)

विविध मुद्द्यांवर ट्विट करून आपली आक्रमक मतं मांडणारा क्रिकेटर म्हणजे गौतम गंभीर. दिल्लीतील प्रदुषणाच्या समस्येवरून गौतम गंभीरने आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. ‘दर्दे दिल, दर्दे जिगर दिल्लीमें जगाया आपने.. पहले तो यहाँ ऑक्सिजन था ऑक्सिजन भगाया आपने’ असा ट्विट करत त्याने जामा मशीद भागाचा एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये धुरक्यात हरवलेली जामा मशीद आणि इतर भाग स्पष्ट दिसून येतो आहे.

 

आमची पिढी खोटी आश्वासनं देणाऱ्या नेत्यांमुळे धुरातच हरवते आहे. वर्षभरात तुम्ही काळजी घेतली असती तर ही वेळ आली असती का? असाही प्रश्न गौतम गंभीरने विचारला आहे. डेंग्यू आणि प्रदूषण रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय योजण्यासाठी तुमच्याकडे एक वर्ष होतं. दुर्दैव हे आहे की अरविंद केजरीवाल तुम्ही या गोष्टींकडे लक्षच दिलं नाही. जरा जागे व्हा असेही गौतम गंभीरने म्हटले आहे. हा ट्विट त्याने अरविंद केजरीवाल यांना टॅगही केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 5:38 am

Web Title: our generations are going up in smoke like your false promises says gautam gambhir
Next Stories
1 रिझव्‍‌र्ह बँक आणि सरकार संघर्ष विकोपाला
2 उद्योगसुलभतेत भारत ७७ व्या क्रमांकावर
3 ‘दुतावासात येताच खाशोगींची हत्या, मृतदेहाचे तुकडे करणेही कटाचाच भाग’
Just Now!
X