आँखे निकालकर हात में देना ही भारताची ताकद आहे. आपला भारत मजबूत आहे मजबूर नाही असं वक्तव्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत केलं आहे. चीनने लडाखच्या गलवानमध्ये जो हल्ला केला त्यात भारताचे २० जवान शहीद झाले. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारताला शांतता हवी आहे याचा अर्थ आम्ही कमकुवत नाही असंही वक्तव्य केलं. अवघा देश आपल्या लष्करासोबत आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत उभा आहे ही भावनाही त्यांनी बोलून दाखवली.

लडाखच्या गलवानमध्ये चीनच्या सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे वीस जवान शहीद झाले. या सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेचा निषेध भारतात होतो आहे. अशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत २० पक्ष सहभागी झाले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली. या बैठकीत सगळ्यांनीच आपल्या सूचना आणि प्रस्ताव मांडले. या सूचनांचा पुढच्या रणनीतीसाठी फायदाच होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.