कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ) काढताना त्यावर कर लादण्याचा वादग्रस्त प्रस्ताव मोदी सरकारने मागे घेतल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वडेरा पुढे सरसावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रॉबर्ट वडेरा यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून मी प्रत्येकाचा आवाज सरकारपर्यंत पोहचवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कर रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर माझे सहकारी आणि जिममधल्या मित्रांनी मिठाई देऊन माझे आभार मानल्याचे रॉबर्ट वडेरा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. याशिवाय, पोस्टवरील तुमचे लाईक्स आणि शेअर्स यामुळे प्रसारमाध्यमांनी हा संदेश सरकारपर्यंत पोहचवल्याचा दावा वडेरा यांनी केला आहे.
अखेर सरकारची करमाघार! 
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मंगळवारी लोकसभेत यासंदर्भातील घोषणा केली होती. यानंतर काँग्रेस पक्ष अपेक्षेप्रमाणे या सगळ्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावताना दिसला. वेतनदारांच्या गळचेपीविरुद्ध मी सरकारला इशारा दिला होता. अखेर माझ्या दबावाचा परिणाम झाला, असे काल राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

I have earned my sweets !!Congratulations to all on the roll back of EPF.Ate sweets at the offices and at the gym,…

Posted by Robert Vadra on Tuesday, March 8, 2016