पन्नास पेक्षा जास्त डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांचे करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली. इंडिया टु़डेने हे वृत्त दिले आहे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याचा हा जो ट्रेण्ड आहे. त्यावर सरकार लक्ष ठेऊन आहे.

करोनाच्या रुग्णांवर उपचार करताना त्यांना बाधा झाली आहे की, बाहेर ते कुठल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले. त्याचा तपास सरकारने सुरु केला आहे. “वैद्यक क्षेत्रातील ५० पेक्षा जास्त जणांना करोनाची लागण झाल्याची प्रकरणे आहेत. पण सर्वांनाच रुग्णांपासून करोनाची बाधा झालेली नाही. काही प्रकरणात परदेश प्रवासाची हिस्ट्री असलेल्यांच्या संपर्कात आल्याची आहेत” असे अधिकाऱ्याने सांगितले.

कोणापासून करोनाची लागण झाली ते शोधून काढण्याचे काम सुरु आहे. काही रुग्णालयांमध्ये सुरक्षा उपकरणांची कमतरता असताना सुद्धा डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत. इटलीमध्ये रुग्णांच्या संपर्कात आलेल्या वैद्य कर्मचाऱ्यांना मोठया प्रमाणात करोनाची लागण झाल्याची प्रकरणे आहेत.