03 April 2020

News Flash

नोकरदार वर्गासाठी खुशखबर… पीएफच्या व्याजदरात वाढ

कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली

एकीकडे रोजगार कपात होत असताना केंद्र सरकारने पीएफच्या व्याजदरात वाढ करत नोकरदार वर्गाला दिलासा दिला आहे. पीएफच्या दरात मोदी सरकारने ०.१० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे व्याजदर ८.५५ टक्क्यांवरून ८.६५ टक्के इतका झाला आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी मंगळवारी दिली.

पीएफच्या व्याजदरात वाढीवरून करण्यावरून केंद्रीय कामगार मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयात एकमत होत नव्हते. दरम्यान, केंद्रीय कामगार मंत्री गंगवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण यांची यासंदर्भात भेट घेतली. “ईपीएफओच्या ४६ मिलियन सदस्यांना ८.६५ टक्के व्याजदर दिल्यानंतरही ईपीएफओ सरप्लस राहणार आहे. त्याचा परिणाम होणार नाही,” असे गंगवार यांनी स्पष्ट केल्यानंतर पीएफ व्याजदराचा मुद्दा निकाला निघाला.

“सण उत्सव तोंडावर असतानाच सरकारने नोकरदार वर्गाला खुशखबर दिली आहे. २०१८-१९ या कालावधीत ईपीएफओच्या ६ कोटी लाभधारकांना ८.६५ टक्के व्याजदर मिळणार आहे,”अशी माहिती गंगवार यांनी दिली. नवी दिल्लीतील एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर त्यांनी व्याजदरात केल्याचे सांगितले. सध्या ईएफपीओतून रक्कम काढायची असेल तर ८.५५ टक्के व्याजदर दिला जात आहे.

सध्या ईपीएफवर दिला जाणार व्याजदर हा कोणत्याही शासकीय योजनेपेक्षा जास्त आहे. गेल्या महिन्यात अर्थमंत्री सीतारामण यांनी जीपीएफ (जनरल प्रॉव्हिडंट फंड) आणि इतर निधीवरील व्याजदर ७.९ टक्के करण्यात आले होते. त्याची मर्यादा ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 5:20 pm

Web Title: over 6 crore epfo members will get 8 65 per cent interest on their deposits bmh 90
Next Stories
1 इंधन दरवाढीचा भडका!
2 इंधनचिंता भांडवली बाजारातही; सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकात घसरण
3 तेल टंचाईचे सावट : सौदी अरेबियाने निम्मं तेल उत्पादन थांबवलं
Just Now!
X