News Flash

करोना पुन्हा बळावतोय? भारतात गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ

१६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच देशात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत

संग्रहित (PTI)

देशात गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा या वर्षातील सर्वाधिक रुग्णवाढ नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ६२ हजार २५८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात लागण होण्याचा हा या वर्षातील उच्चांक आहे. १६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच देशात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले असून यासोबत रुग्णसंख्या १ कोटी १९ लाखांवर पोहोचली आहे. शुक्रवारी देशात ५९ हजार ११८ रुग्ण आढळले होते. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

शुक्रवारच्या तुलनेत देशात शनिवारी रुग्णसंख्या ५.३ टक्क्यांनी वाढली आहे. यासोबत देशात गेल्या २४ तासात २९१ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ६१ हजार २४० इतकी झाली आहे. याशिवाय ३० हजार ३८६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत १ कोटी १२ लाख ९५ हजार २३ जण करोनामुक्त झाले आहेत.

देशात सध्याच्या घडीला ४ लाख ५२ हजार ६४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ५ कोटी ८१ लाख ९ हजार ७७३ जणांचं लसीकरण झालं आहे.

३० जानेवारीला भारतात सर्वात पहिला करोना रुग्ण सापडला होता. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि त्यानंतर ब्राझीलचा क्रमांक आहे. याशिवाय देशात सर्वाधिक करोना फटका बसलेल्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 10:53 am

Web Title: over 62000 new covid cases indias biggest one day spike in over 5 months sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 RTI अर्ज दाखल : मोदींना १९७१ साली कोणत्या कायद्याअंतर्गत अटक झाली?, त्यांना कोणत्या तुरुंगात ठेवलं होतं?
2 क्रूरतेचा कळस! किरकोळ वादातून नवऱ्याने बायकोची बोटंच तोडली
3 Narendra Modi in Bangladesh: “मोदीजी अजून किती फेकणार, हद्द झाली राव”
Just Now!
X