News Flash

ट्रकची पोलीस व्हॅनला धडक, दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू; १७ जखमी

जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

ओडिशामध्ये पोलीस व्हॅनचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून १७ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावर बेलपहर येथे हा पहाटे हा अपघात झाला. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना नेलं जात होतं. ३३ कर्मचाऱ्यांना घेऊन पोलीस व्हॅन जात असताना भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने धडक दिली. धडक इतकी जबर होती की दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत आणि सरकारी नोकरी जाहीर केली आहे. तसंच गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना ज्यांना अपंगत्व येऊ शकतं त्यांना एक लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 11:26 am

Web Title: overspeeding truck rammed into a police van two policemen killed and 17 injured
Next Stories
1 पंजाबमध्ये पाकिस्तानी हेराला अटक; सिम कार्ड, कॅमेरा जप्त
2 २०१९ मध्ये बहुमताने जिंकू, नरेंद्र मोदीच होणार पंतप्रधान – अमित शहा
3 १४ फेब्रुवारीनंतर मला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही, ट्रोल करणाऱ्यांना शहीदाच्या पत्नीचं उत्तर
Just Now!
X