News Flash

पटेलांना आरक्षण मग मुस्लिम समाजाला का नाही? – ओवेसी

मुस्लिमांची नेहमीच सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांकडून फसवणूक

'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यानंतर अनेक विरोधकांनी काँग्रेस तसेच पाटीदार समाजाचा नेता असणाऱ्या हार्दिक पटेल यांच्यावर टिका करण्यास सुरुवात केली. ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस आणि हार्दिक यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याच्या मुद्द्यावरून मुसलमानांच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यास तयार आहे. पण सामाजिक तसेच शैक्षणिक आघाड्यांवर मागासलेल्या मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यास तयार नसल्याबद्दलची नाराजी त्यांनी ट्विटवरून व्यक्त केली.

काँग्रेसला पाठिंबा देत असल्यासंदर्भात हार्दिक पटेलच्या पत्रकार परिषदेनंतर बोलताना ओवेसी यांनी ट्विटवरून काँग्रेसवर निशाणा साधला. हार्दिक पटेलने काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यास तयार असल्याचे सांगितले मात्र सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मुसलमानांना आरक्षण द्यायला काँग्रेस तयार नाहीत. मुस्लिम समाज राजकीय दृष्ट्या दुबळा आहे. आणि दुबळ्या लोकांना गप्प राहण्यास सांगण्यात येते, असे ओवेसी ट्विटमध्ये म्हणाले आहेत. ही मुसलमानांसाठी स्टॉकहोम सिंड्रोमसारखी स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्टॉकहोम सिंड्रोम म्हणजे अपहरण होणाऱ्या व्यक्तीला त्याचे अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्याबद्दल सहानभूती असते. याचाच अर्थ नेहमीच सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांकडून फसवणूक होत असली तरी मुस्लिम समाज त्यांनाच निवडून देतो.

दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक पटेल यांनी आमची लढाई भाजप विरुद्ध असल्याने आम्ही काँग्रेसला समर्थन देत असल्याचे जाहीर केले. तसेच काँग्रेसने पाटीदारांना आरक्षण देण्याची मागणीही मान्य केल्याचे पटेल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 4:59 pm

Web Title: owaisi tweet for muslim reservation after hardik patel accepts congress quota formula for patidars
Next Stories
1 उच्च व सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनात वाढ, वित्त आयोगाची स्थापना
2 कुपवाडा येथे चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा; एक जवान शहीद
3 राममंदिर प्रकरणात पाकिस्तानकडून अडथळे: शिया वक्फ बोर्ड
Just Now!
X